17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयसीआयएसएफच्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता

सीआयएसएफच्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता

नवी दिल्ली : विमानतळासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा दलांची झपाट्याने वाढणारी तैनाती लक्षात घेऊन केंद्र सरकारने पहिल्या महिला सीआयएसएफ राखीव बटालियनला मान्यता दिली आहे. यामध्ये १ हजाराहून अधिक महिला कर्मचारी भरती केले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या मंजूर दोन लाख सीआयएसएफ कर्मचा-यांमधून हे युनिट तयार केले जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने याच आठवड्यात आपला आदेश जारी केला आहे. वरिष्ठ कमांडंट दर्जाच्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली एकूण १०२५ महिला कॉन्स्टेबल या बटालियनमध्ये असतील.
सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे १२ राखीव बटालियन आहेत.

नावाप्रमाणेच, या बटालियन्स राखीव ठेवल्या जातात. निवडणूक आणि इतर महत्वाच्या प्रसंगांसाठी सीआयएसएफची तात्पुरती नियुक्ती केली जाते. तेव्हा त्यांचा अतिरिक्त फोर्स म्हणून वापर केला जातो. संसद भवन संकुलासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाची सुरक्षाही ते सांभाळत असून या वर्षी संसदेची जबाबदारी सोपवण्यात आली.

विशेष म्हणजे, सीआयएसएफमध्ये महिला कर्मचारी देखील मोठ्या संख्येने आहेत, ज्या ६८ सार्वजनिक विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि ताजमहाल आणि लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण करतात. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सीआयएसएफने ऑल वुमन राखीव बटालियनची गरज व्यक्त केली होती, ज्याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR