33.6 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रजीबीएस रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

जीबीएस रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

४७ रुग्ण आयसीयूत, तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर

पुणे : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांमध्ये दररोज वाढ होत असून, सोमवारी नव्याने पाच रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुण्यातील जीबीएस संशयित रुग्णसंख्या १६३ झाली आहे. यापैकी ४७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, ४७ रुग्ण आयसीयूमध्ये आणि २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

बाधितांमधील ३२ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील, तर ८६ रुग्ण समाविष्ट गावातील आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १८, ग्रामीणमधील १९ आणि इतर जिल्ह्यातील ८ रुग्णांचा यात समावेश आहे. बाधित रुग्णसंख्येत २० ते २९ वयोगटातील सर्वाधिक ३५, तर ० ते ९ वयोगटातील २४ आणि ५० ते ५९ वयोगटातील २५ रुग्णांचा समावेश आहे.

पालिकेने केले ४३ हजार घरांचे सर्वेक्षण
गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिका अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. समाविष्ट गावांमध्ये सर्वेक्षण, विहिरीच्या पाण्यात क्लोरिनची मात्रा वाढविणे, सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर खाटांची उपलब्धता, रुग्णांना मोफत उपचार, रुग्णांच्या नातेवाइकांचे समुपदेशन ते विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिकेकडून ४३ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR