22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी

संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी

बाईकवर आले, हातात १० मोबाईल राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : एकीकडे नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच आता मुंबईत मोठी घडामोड समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलिस चौकशी करत आहेत.
दरम्यान, दोन जण संजय राऊत यांच्या घराबाहेर आले. त्यांच्या हातात आठ ते दहा मोबाईल होते. वाहनचालकाच्या हातात मोबाईल होता. तर मागे बसलेल्या व्यक्तीकडे चौरशी पुठ्ठ्यावर अनेक मोबाईल असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमके काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे प्रकरण गंभीर : सुनील राऊत
या प्रकरणावर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, घटनास्थळी झोन सात मधील पोलिस विभागाची विविध पथके दाखल झाली आहेत. सीसीटीव्ही आणि आजूबाजूला कसून चौकशी करण्यात येत आहे.जी बाईक होती ती यूपी, बिहारची असावी, बाबा सिद्धीकी प्रकरण घडल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचे आमदार सुनील राऊत यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR