पुणे : येरवडा कारागृहात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास महेश चंदनशिवे या कारागरातील कैद्याचा कारागृहातील बंदी असलेल्या कैद्यांच्या टोळक्याने खून केला होता. हत्येच्या या घटनेमुळे येरवडा कारागृह पुन्हा एकदा हादरले होते. महेश महादेव चंदनशिवे असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. पूर्व वैमान्यासातून ४ कैद्यांकडून महेशची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मयताचे नातेवाईक पुण्यातील ससून रुग्णालयात आक्रमक झाले असून कारागृह पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नातेवाईकांनी म्हटले आहे की, जोपर्यंत पोलिसावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा आक्रमक पावित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैचीने आणि धारदार हत्याराने मानेवर वार करत मयत महेशची हत्या करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात आता चंदनशिवे यांचं कुटुंब आक्रमक झाले आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करा नाही तर मृतदेह स्विकारणार नाही, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.