नवी दिल्ली : ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर ७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
एकीकडे पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या या आमदार अपात्रतेचे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या यादीत नमूद करण्यात आलं आहे. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी आज हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर सादर केले. या प्रकरणाची सुनावणी आता ७ मार्च किंवा ११ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती.
एकीकडे पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा दिलासा मिळाला. पक्ष-चिन्हाबाबतची सुनावणी १९ एप्रिलला होणार आहे.