वॉशिंग्टन : धार्मिक स्वातंर्त्याचे उल्लंघन करणा-या देशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तान आणि चीनचा समावेश केला आहे. या यादीत म्यानमार, रशिया, इराण, उत्तर कोरिया आणि सौदी अरेबियासह अनेक देशांची नावे असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या देशांचा विशेष चिंता असलेल्या देशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाशी संबंधित गंभीर प्रकरणे येथे नोंदवण्यात आली आहेत. तर पाकिस्तानने अमेरिकेचा अहवाल फेटाळला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले हा दावा एकतर्फी, भेदभावपूर्ण आणि अनियंत्रित मापदंडांवर आधारित आहे. अशी पावले इस्लामाबाद आणि वॉशिंग्टनचे जागतिक स्तरावर धार्मिक स्वातंत्र्य वाढवण्याच्या ध्येयाला खीळ घालतात. पाकिस्तान म्हणाला की आम्ही बहुलवादी देश आहोत. धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. पाकिस्तानचा असा विश्वास आहे की धार्मिक असहिष्णुता, झेनोफोबिया आणि इस्लामोफोबियाचा सामना परस्पर समंजसपणा आणि आदराच्या आधारावर केला जाऊ शकतो. या मुद्यावर पाकिस्तानने अमेरिकेशी द्विपक्षीय चर्चाही केली आहे. ईशनिंदा कायद्याच्या वापराची चौकशी न केल्याने पाकिस्तानवर जागतिक स्तरावर टीका होत आहे. या कायद्यांचा गैरवापर करून कट्टरतावादी समुदाय हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, अहमदिया मुस्लिम या धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करतात.
पाकिस्तानमध्ये ईशंिनदा कायद्याचा गैरवापर
ऑगस्ट २०२३ मध्ये, पाकिस्तानातील फैसलाबाद येथे चर्च जाळल्यानंतर जमावाने ईशनिंदेचा आरोप केला. २०२१ मध्ये, एका व्यक्तीवर ईशंिनदा केल्याचा आरोप झाल्यानंतर संतप्त जमावाने वायव्य पाकिस्तानमधील एक शतक जुन्या मंदिरावर हल्ला केला. याशिवाय सियालकोटमध्ये श्रीलंकेतील व्यापारी प्रियंता कुमाराच्या ंिलंिचगनंतर जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या ईशंिनदा कायद्यावर टीका झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सक्तीचे धर्मांतर, अपहरण आणि जबरदस्ती विवाह यांसारखे गुन्हेही पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर होतात.