25.9 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeराष्ट्रीयरेल्वेच्या ६,४५० किमी ट्रॅकचे नूतनीकरण

रेल्वेच्या ६,४५० किमी ट्रॅकचे नूतनीकरण

रेल्वे विभागाची कामगिरी

नवी दिल्ली : २०२५ वर्षारंभाला अवघे काही तास शिल्­लक राहिले आहेत. आता २०२४ वर्षाला निरोप देताना वर्षभरातील आपल्­या कामाचा लेखाजेखा भारतीय रेल्­वेने आज प्रसिद्ध केला आहे. या वर्षी भारतीय रेल्वेने ६,४५० किलोमीटर ट्रॅकचे नूतनीकरण, ८,५५० किलोमीटर ट्रॅकचे टर्नआउट नूतनीकरण. तसेच रेल्­वेच्­या प्रमुख विभागांमध्­ये १३० किमी प्रतितास वेग वाढवला असल्­याचे रेल्­वे मंत्रालयाने आपल्­या अहवालात नमूद केले आहे.

भारतीय रेल्­वेने या वर्षी देशभरातील ३,२१० किलोमीटर ट्रॅकचे विद्युतीकरण केले. विद्युतीकृत ब्रॉडगेज नेटवर्क ९७ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आणि अक्षय ऊर्जा क्षमता २,०१४ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. वर्षभरात विक्रमी १३६ वंदे भारत गाड्या आणि पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे सुरू करण्यात आली, तसेच पीक सीझनमध्ये २१,५१३ विशेष ट्रेन ट्रिपही सादर करण्यात आल्या, असे पुनरावलोकन अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत १,३३७ स्थानकांपैकी १,१९८ स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले. इतर स्थानके निविदा आणि नियोजनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.

देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे रोजगार निर्मिती आणि सुधारित आर्थिक वृद्धीसह अर्थव्यवस्थेवर सकारात्­मक परिणाम होतील, असा विश्­वासही पुनरावलोकन अहवालात व्­यक्­त करण्­यात आला आहे. भारतीय रेल्­वेने देशातील ८० स्­थानांसह ७८ हेरिटेज साइट्सचे डिजीटलीकरण केले, तर घूमसारख्या सणांनी पर्यटनाला चालना दिली आहे. एकूण २०८ कोटी रुपये खर्चून हत्तींचा अपघात रोखण्यासाठी एनएफआर(ईशान्य फ्रंटियर रेल्वे) मधील गंभीर संवेदनशील ठिकाणी नो एलिफंट इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम (ईआयडीएस) देखील कार्यान्वित करण्यात आल्­याचेही या अहवालात स्­पष्­ट करण्­यात आले आहे.

१०,००० लोको कवच
सुमारे १०,००० लोको कवच सुरक्षा तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. रेल्वे नेटवर्कवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी आधुनिकीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून १५,००० किमी मार्गासाठी बोली मागविण्यात आल्या आहेत असेही या अहवालात स्­पष्­ट करण्­यात आले आहे.

वर्षभरात १,४७३ टन मालवाहतूक
ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरद्वारे ७२,००० पेक्षा जास्त ट्रेन धावण्याची सुविधा देऊन कमाई वाढवण्यासाठी २०२४ मध्ये रेल्वेने १,४७३ दशलक्ष टन मालवाहतूक देखील केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR