29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रश्रीमंत शाहू छत्रपती आहेत अब्जाधीश

श्रीमंत शाहू छत्रपती आहेत अब्जाधीश

निवडणुकांमुळे समोर आली संपत्तीची माहिती

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात यंदा सातारा आणि कोल्हापुरात राजघराण्याचे वारसदार निवडणुकांच्या मैदानात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले भाजपाकडून साता-यात उमेदवार आहेत. तर, कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आले आहे.

कोल्हापूरच्या गादीचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही आपल्या उमेदवारी अर्जासोबत एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटी ०६ लाखांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे शाहू महाराजांवर कसलेही कर्ज नाही.

शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर १४९ कोटी ७३ लाख ५९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे १७ कोटी ३५ लाख व २३ कोटी ७१ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. शाहूंकडे १ कोटी ५६ लाखांचे सोन्याचे, तर ५५ लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या नावावरील वाहनांची किंमत सहा कोटी आहे. १२२ कोटी ८८ लाख इतक्या किमतीची शेतजमीन त्यांच्या नावावर आहे. तर, पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी ५२ लाख रुपयांची शेतजमीन आहे. शाहू महाराजांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय मंडलिक हेही कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल १४ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

महायुतीचे संजय मंडलिक हेही कोट्यधीश
कोल्हापूर मतदारसंघातील शाहू छत्रपतींचे प्रतिस्पर्धी आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये एवढी आहे. मंडलिक यांच्या संपत्तीत २०१९ च्या तुलनेत तब्बल ५ कोटी ६५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. खा. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता १ कोटी १५ लाख ३२ हजार ५२५ रुपये असल्याचे म्हटले आहे. तर, १३ कोटी २१ लाख ९५ हजार ८७३ रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी विवरणपत्रात नमूद केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR