22.3 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeछत्रपती संभाजीनगररिक्षाचालक ते आमदार; शिरसाट यांच्या संपत्तीत १० पटीने वाढ

रिक्षाचालक ते आमदार; शिरसाट यांच्या संपत्तीत १० पटीने वाढ

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले संजय शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा पश्चिम विधानसभेत मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

शपथपत्रानुसार, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत १० पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. पाच वर्षांच्या कालावधीत त्यांची संपत्ती ३ कोटी ३१ लाखावरून तब्बल ३३ कोटी ३ लाखांवर गेली आहे. आज रोजी त्यांच्याकडे ४४ लाख ७८ हजार रोकड आहे, तर विविध बँकांचे त्यांच्याकडे २६ कोटी ४५ लाख ७५ हजार ९२२ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद आहे.

शिरसाट यांनी शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे ४ कोटी ३७ लाख ६० हजार ७६१ रुपये किमतीची शेतजमीन, तर ४ कोटी ७० लाख ४५ हजार ८६० रुपयांचे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फ्लॅट आहेत.

संजय शिरसाट यांच्या संपत्तीत गेल्या ५ वर्षात मोठी वाढ दिसली. २०१९ मध्ये त्यांच्याकडे १.२१ कोटींची जंगम संपत्ती होती. २०२४ मध्ये हा आकडा १३.३७ कोटींवर पोहचला आहे. तर २०१९ मध्ये स्थावर संपत्ती १.२४ कोटी रुपयांची होती. आता हा आकडा २०१४ मध्ये १९.६५ कोटी रुपयांवर पोहचला आहे. २०१९ मध्ये त्यांच्याकडे जे सोने होते त्यात वाढ झाली. हा आकडा आता १.४२ कोटी इतका झाला आहे. २०१९ मध्ये त्यांच्याकडे ५ लाखांची ठेव होती. २०२४ मध्ये हा आकडा ८१ लाखांवर पोहचला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR