सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाची पूजा आज शुक्रवारी दुपारी दक्षिण कसब्यातील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात अॅड. रितेश थोबडे यांच्याहस्ते विधिवत करण्यात आली.
योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे. दुपारी मानकरी सिध्देश्वर कंठीकर यांनी कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले. त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर होम हवन करण्यात आले. कै.शेटे यांचे वारसदार अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. रितेश थोबडे यांनी मानकरी सागर हिरेहब्बू व हब्बू यांची पाद्यपूजा केली.योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या हातातील दंडाची पूजा शुक्रवारी दुपारी शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ऍड. रितेश थोबडे यांच्याहस्ते विधिवत करण्यात आली.
योगदंडाच्या पूजनाने सिद्धरामेश्वर महाराज अक्षदा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे. शेटेवाड्याच्या प्रवेशद्वाराने वाड्याला रंगबिरंगी झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. अक्षता सोहळ्याच्या वधू-वरांना पाहुण्याच्या घरी बोलावुन जेऊ घालण्याची प्रथा आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी साडेनऊशे वर्षांपूर्वी कै.रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते. तीच परंपरा कायम ठेवून सिध्दरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड कसब्यातील शेटे यांच्या वाड्यात आणून केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.
मानकरी सिध्देश्वर कंठीकर यांनी कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले. त्यानंतर मानकरी वाड्यात आल्यानंतर योगदंड चौरंग पाटावर ठेवून कुमकुम फुले वाहून संबळाच्या निनादात विधिवत पूजा करण्यात आली.
त्यानंतर होम हवन करण्यात आले. कै.शेटे यांचे वारसदार ऍड.मिलिंद थोबडे यांचे चिरंजीव रितेश थोबडे यांनी मानकरी सागर हिरेहब्बू व हब्बू यांची पाद्यपूजा केली. योगदंडास केळीच्या पानामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. ऍड. मिलिंद थोबडे यांना १९८७ पासून सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाची पूजा करण्याचा मान आहे.
जानेवारी २०१२ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपला वारसा चिरंजीव ऍड.रितेश थोबडे यांच्याकडे सोपविले. गेल्या १३ वर्षापासून अॅड रितेश थोबडे यांच्याहस्ते योगडांची पूजा होते. यावेळी ऍड. मिलिंद थोबडे, सुचेता थोबडे, विजया थोबाडे, श्रद्धा थोबडे, ललिता थोबडे, सिद्धेश थोबडे, प्रणिका थोबडे, प्रतीक थोबडे, सुधीर थोबडे, विक्रांत थोबडे, गीता थोबडे यांच्यासह राजश्री देसाई, वैशाली अक्कलवाडे तर सागर हिरेहब्बू, अमित हब्बू, राजेश हब्बू, आकाश हब्बू, सदानंद हब्बू, विजयकुमार हब्बू आदी उपस्थित होते.
तसेच सिद्धेश्वर देवस्थानचे पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी बाळासाहेब भोगडे, अण्णाराज काडादी, गिरीश गोरणळी, प्रकाश वाले, राजशेखर शिवदारे, नरेंद्र गंभीरे यांच्यासह आदी उपस्थित होते.
शिवशंकर थोबडे प्रशालाचे विद्यार्थी बाराबंदी पोशाख घालून, हातात नंदिध्वज घेत योगदंडाच्या पूजेत शेटे वाड्यामध्ये सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षी शेटेवड्याला रंगीबेरंगी झेंडू आणि शेवंतीच्या फुलानी सजावट करण्यात आली होती.