पुणे : शहर पोलिस दलातील ४ पोलीस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचा-यांनी पोलीस ठाण्यातच अफरातफर केली आहे. रक्षकच असे करायला लागले तर कसं व्हायचं? अशी चर्चा परिसरात सुरु आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचा-यांनी पोलीस स्टेशनमध्ये दरोडा टाकला. पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या कर्मचा-यांनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात जप्त केलेल्या दुचाकी विकल्या. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीकडून चौकशी केली असता या पोलीस कर्मचा-यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली या आरोपीने दिली तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलिसांनी या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले.