23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्ररोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम

रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम

मुलींच्या मोफत शिक्षणाच्या आठवणीला जागरण;

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिनी म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ, असो की महाविद्यालयीन ६६२ व्यवसायीक कोर्सेससाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणेनंतर ४ महिने उलटूनही अद्याप अंमलबजाणवणी करण्यात आली नाही.

विशेष म्हणजे, १२ वी, पदवी, आणि पदव्युत्तर परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून मुला-मुलींचे महाविद्यालयीन प्रवेशही सुरू झाले आहेत. मात्र, प्रवेशावेळी फी आकरण्यात येत असल्याने विद्यार्थींनींकडून विचारणा केली जात आहे. त्यातच, विरोधी पक्षातील नेत्यांनीही मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. आता, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी थेट बदाम पाठवत चंद्रकांत दादांना आठवण करुन दिली आहे.

मुलींना मोफत शिक्षणासंबंधीचा राज्य सरकारचा ना जीआर निघाला, ना अंमलबजावणी झाली. प्रवेशासाठी मुलींना भरमसाठ फी भरावी लागते. महाविद्यालयाच्या भरमसाठ फी मुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते, किंवा शाळाच सोडावी लागते. परभणीमध्ये गेल्यावर्षी एका मुलीने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारकडून मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे, विरोधी पक्षांनी चंद्रकांत पाटलांसह राज्य सरकारला धारेवर धरले आहे. यापूर्वी, खासदार सुप्रिया सुळेंनीही या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांना थेट सवाल केला होता. आता, रोहणी खडसे यांनी चक्क बदाम पाठवून त्यांना आठवण करुन दिली आहे.

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण.. असे म्हणत रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर हाती बदामाची वाटी घेऊन व्हिडिओ शेअर केला आहे. आपण दिलेल्या घोषणेची आठवण करुन देण्यासाठी तुम्हाला हे बदाम पाठवण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR