27.5 C
Latur
Thursday, July 17, 2025
Homeक्रीडाटीम इंडियामध्ये रोहितची एन्ट्री

टीम इंडियामध्ये रोहितची एन्ट्री

मुंबई : अफगाणिस्ताविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणी केली आहे. या मालिकेमध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. रोहित शर्मा याची टी-२० संघामध्ये एन्ट्री झाली आहे. वर्ल्ड कप आधी टीम इंडियासाठीसाठी अफगाणिस्तानविरूद्धची टी-२० मालिका महत्त्वाची आहे. मात्र रोहित संघात आल्याने एका खेळाडूसाठी वाईट बातमी आहे. कारण रोहित संघात आल्यामुळे या खेळाडूला संघात जागा भेटणार नाही. कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.

रोहित शर्मा आता टी-२० चा कॅप्टन झाल्यामुळे तो प्लेइंग ११ मध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र यामुळे एका हुकमी खेळाडूला प्लेइंग ११ मध्ये जागा मिळणार नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यशस्वी जयस्वाल आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन्हीसुद्धा सीनिअर खेळाडू असल्याने दोघेही खेळणार हे नक्की आहे. दोन खेळाडू संघात आल्याने प्लेइंग ११ मध्ये ओपनिंगला रोहित शर्मासोबत शुबमन गिल आणि तिस-या क्रमांकावर विराट कोहली खेळतील. त्यामुळे जयस्वाल याला संधी मिळणार नाही. कारण शुबमन गिल संघातील महत्त्वाचा खेळाडू असून टीम मॅनेजमेंट त्याला बसवणार नाही.

टीम इंडियाची शेवटची टी-२० मालिका आफ्रिकेविरूद्ध झाली होती. या मालिकेमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सुर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आले होते. मात्र सूर्या जखमी असल्यामुळे या मालिकेमध्ये खेळताना दिसणार नाही. यंदा होणा-या वर्ल्ड कप आधी टीम इंडियाची एकमेव टी-२०मालिका असणार आहे. त्यामुळे रोहित अँड कंपनी या मालिकेमध्ये छाप सोडताना दिसतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR