21 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रसचिन वाझेला जामीन

सचिन वाझेला जामीन

मुंबई : प्रतिनिधी
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारा बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर झालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वाझेला जामीन दिला आहे. १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझेने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो जामीन अर्ज मंजूर झाला आहे.

या प्रकरणात मी माफीचा साक्षीदार बनलो आहे. शिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख यांच्यासह सर्व आरोपींना जामीन मिळालेला आहे. त्यामुळे मलाही जामीन मिळण्याचा हक्क आहे, असे वाझेने जामीन अर्जात नमूद केले होते. या अर्जावरील सुनावणी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने २३ ऑगस्टला पूर्ण केली आणि निकाल राखून ठेवला होता. तो न्यायालयाने आज दिला.अनिल देशमुख यांच्याशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझेला दिलासा दिला आहे.

जामिनाच्या अटी आणि शर्ती निश्चित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने विशेष पीएमएलए न्यायालयाला दिले होते. या प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मिळाल्याचा दाखला देत वाझेने जामीन देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. पण त्याला जामीन देण्यास सक्तवसुली संचलनालयाने विरोध केला होता. पण आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाझेला जामीन मंजूर झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR