25.4 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeराष्ट्रीयचिनी योजनांना मोदी सरकार शरण गेले हे खेदजनक : मल्लिकार्जुन खर्गे

चिनी योजनांना मोदी सरकार शरण गेले हे खेदजनक : मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली : वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) तयार करण्यात आलेल्या बफर झोनमुळे १९६२ च्या युद्धाचे नायक मेजर शैतान सिंग यांचे स्मारक पाडण्यात आले आहे. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शैतान सिंग यांचे स्मारक पाडून भाजपने पुन्हा एकदा खोट्या देशभक्तीचा पुरावा दिला आहे. चिनी योजनांना मोदी सरकार शरण गेले हे खेदजनक आहे. भारत मातेचे शूर सुपुत्र, परमवीर चक्र आणि १९६२ च्या रेझांग-ला युद्धातील महान वीर मेजर शैतान सिंग यांचे लडाख येथील चुशुल येथील स्मारक पाडल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.

खर्गे यांनी विचारले की, गलवानमध्ये लष्कराच्या २० जवानांच्या बलिदानानंतर पंतप्रधान मोदींनी चीनला क्लीन चिट दिली होती हे खरे नाही का? रेझांग लाचे रक्षण करण्यासाठी मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली १३ कुमाऊँच्या सी कंपनीच्या ११३ शूर सैनिकांनी दिलेला सर्वोच्च बलिदान हा देशाचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. त्यांनी काव्यात्मक शैलीत पंतप्रधानांवर घणाघाती हल्ला चढवला आणि म्हणाले की, तुम्ही चीनकडे डोळेझाक केलीत, शूरवीरांच्या बलिदानाच्या प्रत्येक थेंबाचा अपमान केला!

मोदी सरकार अपयशी
खर्गे म्हणाले की, २०१४ पासून पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात २० बैठका झाल्यानंतरही, मोदी सरकार मे २०२० पूर्वी डेपसांग प्लेन, पॅंगॉन्ग त्सो, डेमचौक आणि गोगरा-हॉटस्प्रिंग भागात भारताला यथास्थिती राखण्यात मदत करण्यात अपयशी ठरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR