28.5 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रसलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या : कैलास गोरंट्या

सलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या : कैलास गोरंट्या

मुंबई : मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड समजला जाणारा सलीम कुत्ता याची १९९८ मध्ये रुग्णालयातच हत्या झाली होती. पण, आमदार नितेश राणे या सलीम कुत्तावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत आहे.

गृहमंत्र्यांनी या सलीम कुत्ता प्रकरणी सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

सलीम कुत्ता याला मारणारे रोहित वर्मा, बाळू ठाकरे, संतोष शेट्टी हे लोक आहेत. त्याला तीन बायका होत्या. टाडा कोर्टात त्याच्या तीनही बायकांनी आमचा पती सलीम कुत्ता मेला असून आमची संपत्ती परत करा, अशी विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने जप्त केलेली संपती सलीम कुत्ताच्या कुटुंबीयांना परत केली होती.

परंतु, आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्तासाठी आयोजित पार्टीचा फोटो दाखविला आहे. तसेच हा सलीम कुत्ता १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचा दावा करताहेत, तो नेमका कोण, याचा खुलासा गृहमंत्र्यांनी करावा, असे आमदार गोरंट्याल म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR