22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजन‘सॅम बहादूर’चा १०० कोटींचा आकडा पार

‘सॅम बहादूर’चा १०० कोटींचा आकडा पार

मुंबई : विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला ‘सॅम बहादूर’ सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. भारतीय लष्करातील मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे.

‘सॅम बहादूर’ बरोबरच रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. ‘अ‍ॅनिमल’ची क्रेझ आणि बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ठाण मांडून बसलेला असताना विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ने मात्र प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

‘सॅम बहादूर’ बॉक्स ऑफिसवर रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ला तगडी टक्कर देत आहे. बॉक्स ऑफिसवरील बिग बजेट सिनेमांच्या शर्यतीत ‘अ‍ॅनिमल’ची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ डंका वाजवत आहे.‘अ‍ॅनिमल’च्या दुनियेत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. १७ दिवसांनंतरही ‘अ‍ॅनिमल’ला ‘सॅम बहादूर’ तगडी टक्कर देत आहे.

विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाने १७व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५.५० कोटींची कमाई केली. ५५ कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत देशात ७६.८५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. ‘सॅम बहादूर’ सिनेमात विकी कौशलबरोबर सान्या मल्होत्रा, फातिमा शेख, नीरज काबी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR