27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रसमाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार?

समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार?

१९ जुलैला मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन

मुंबई : प्रतिनिधी
समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्यास महाराष्ट्रात आपण स्वबळावर लढू, असा इशारा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी गेल्या आठवड्यात दिला आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विजयी झालेले सर्व नवनिर्वाचित ३७ खासदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि सत्कारासाठी मुंबईत येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे ३७ उमेदवार विजयी झाले आहेत. यानंतर सपा प्रत्येक राज्यात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने काम करत आहे. १९ जुलैला वांद्रे रंग शारदा येथे सर्व खासदारांचा समाजवादी पक्ष महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. तर आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून मुंबईतील आपल्या व्होट बँकेला अधिक सक्षम करण्यासाठी समाजवादी पक्षाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची चर्चा आहे.

सपा खासदारांच्या मुंबई दौ-यादरम्यान अखिलेश यादव यांच्यासह सर्व खासदार चैत्यभूमी, गांधी संग्रहालय आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दादर येथे भेट देणार आहेत.

पुढच्या काही महिन्यांतच निवडणुका
दरम्यान, पुढच्या काही महिन्यांतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता समाजवादी पार्टी देखील विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR