18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरसंभाजी आरमारचा दसरा दरबार उत्साहात

संभाजी आरमारचा दसरा दरबार उत्साहात

सोलापूर : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील संभाजी आरमारचा १७ वा दसरा दरबार डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अनिल हुलसूरकर, पंडित वेणुगोपाल जिल्ला, माजी उपमहापौर नानासाहेब काळे, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून शुभारंभ करण्यात आला.

कर्तबगार व्यक्तिमत्वांच्या सन्मानांची परंपरा कायम राखत कौटुंबिक न्यायालय न्यायाधीशपदी निवड झाल्याप्रित्यर्थ ऍड. अमित आळंगे, हॉटेल उद्योजक सिद्धेश्वर मोरे, रॉबिनहूड आर्मीचे हिंदुराव गोरे, स्मशान सुधारक प्रवीण मुसपेठ, विद्यापीठ विधी परीक्षा प्रथम गौरव काळे, वृक्ष संवर्धन समिती, बार्शी यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सर्व क्षेत्रात सोलापूरच्या होणाऱ्या पिछेहाटीला राजकीय लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे सांगत संघटना पूर्वीपेक्षाही जास्त आक्रमक पद्धतीने सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करणार असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते जल अभ्यासक रजनीश जोशी यांनी उजनी धरण तारक कि मारक हा विषय उलगडत असताना, उजनीच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण बदलून सधनता आली मात्र पुणे जिल्ह्याने केलेल्या प्रदूषणामुळे सोलापूरकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगितले.

उजनी धरण प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्व स्तरावरच्या व्यापक जनआंदोलनाची गरज असून संभाजी आरमार सारख्या लढाऊ संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक गिरीश देवकाते यांनी केले. या दसरा दरबारामध्ये ऍड.महेश जगताप, उद्योजक माउली झांबरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख नामदेव पवार यांच्यासह संभाजी आरमारचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिवप्रेमी व शहरपरिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR