मुंबई : संजय दत्त आणि मान्यता दत्त हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रमुख जोडप्यांपैकी एक मानले जाते. या दोघांच्या लग्नाला आज १६ वर्ष पूर्ण झाली असून, ते लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. खलनायक, मुन्नाभाई बनूण प्रेक्षकांच्या मनावर संजय दत्तने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
तर संजयची पत्नी मान्यतानेही सुरुवातीला काही चित्रपटात काम केल्यानंतर दोघांचे लग्न झाले त्या नंतर मान्यताने स्व:ताला अभिनयापासून दुर ठेवले आहे. मात्र सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. रविवारी मान्यताने लग्नाच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी, मान्यताने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे आणि संजुबाबाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मान्यताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोमध्ये संजयसोबत मान्यताही दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना मान्यताने कॅप्शनमध्ये लिहिले की, सोळा वर्षे एकत्र, आम्ही आमच्या आयुष्यातील गोड आणि आंबट क्षण साजरे करण्यासाठी नेहमी एकत्र असू. या पोस्टवर संजुबाबाचे चाहते आणि बॉलिवूड कलाकार दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.