कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉय दोषी आढळला आहे. सियालदाह न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने आज हा निकाल सुनावला आहे.
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर ५७ दिवसांनी हा निकाल देण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घटनेचा तपास करणा-या सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते.
गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी आरजी कर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमधून पीडितेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेच्या दुस-याच दिवशी मुख्य आरोपी, नागरी स्वयंसेवक संजय राय याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गेल्या काही दिवसापासून कोर्टात सुनावणी सुरु होती. आता कोर्टाने संजय रॉय हाच या प्रकरणातील आरोपी असल्याचा निकाल दिला आहे.
संजय रॉय एकटाच गुन्हेगार
स्वयंसेवक संजय रॉय हा गुन्ह्याचा गुन्हेगार होता. त्याचे सीमन सॅम्पलही जुळले आहेत. सीबीआयचा दावा आहे की सीएफएसएलच्या अहवालात हे वीर्य संजय रॉय याचे असल्याचे पुष्टी झाली आहे. अनेक भौतिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालांच्या आधारे, संजयने हा गुन्हा एकट्यानेच केल्याचे सिद्ध होते. ९ ऑगस्ट रोजी गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला एक छोटासा केस फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. अहवालात हा केस संजय रॉय याचा असल्याचे म्हटले आहे. घटनेच्या २४ तासांच्या आत कोलकाता पोलिसांनी त्याला अटक केली.