29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयसंजय रॉयनेच केली हत्या

संजय रॉयनेच केली हत्या

कोलकाता : कोलकाता या ठिकाणी असलेल्या आर. जी. कर महाविद्यालयात ९ ऑगस्टला एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे.

ट्रेनी डॉक्टरवर संजय रॉयनेच बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली असा उल्लेख या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. ट्रेनी डॉक्टरवर सामूहिक बलात्काराची घटना घडलेली नाही असेही चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयात ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करणारी एक डॉक्टर ८ ऑगस्टच्या रात्री उशिरा तिची शिफ्ट संपल्यानंतर आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये आराम करण्यासाठी गेली होती. ९ ऑगस्टला सकाळी तिचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा कळले की या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावर २५ जखमा होत्या. संजय रॉयनेच या डॉक्टरवर आधी बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्याकेली. तिच्या मृतदेहाची विटंबना केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR