मुंबई : लोकसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीची प्रचारसभा सुरू आहे. काल ठाकरे गटाची मुंबईत सभा झाली. या सभेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आमदार सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला.
काल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना इशारा दिला. गणपती बाप्पााच्या मिरवणुकीत बंदूक काढली आणि पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी बंदूक चालवली हे त्यांचे हिंदूत्व आहे का? आमच्या गणपती बाप्पांच्या मिरवणुकीत तुम्ही बंदूक काढली तुमच्यावर युएपीए कायदा मी टाकणार आहे, सोडणार नाही. पोलिस स्टेशनमध्ये फायरींग केले तुम्हाला आत टाकणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना दिला.