22.8 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeसोलापूरशेअर मार्केटमधील आमिषाने पावणेसहा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमधील आमिषाने पावणेसहा लाखांची फसवणूक

सांगोला : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा म्हणत पाच व्यक्तींनीपाच लाख ८० हजार रुपयांची एकाची फसवणूक केली आहे. अजयकुमार आर्या, सौरभ चावला, बलजित सिंग, करणजित सिंग, राजेंद्र कुमार या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची फिर्याद सचिन शांताराम वाघमारे (रा. संगेवाडी, ता. सांगोला) यांनी दिली आहे.

कॅपमोअर एफ. एक्स या कंपनीचे अजयकुमार आर्या, सौरभ चावला, बलजित सिंग, करणजित सिंग आणि राजेंद्र कुमार यांनी मिटींग घेतली होती. या मिटींगमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा आम्ही ८ ते १० टक्के महिना परतावा मिळवून देवू असे आमिष दाखवून भुरळ पाडली. वरील व्यक्तींनीरक्कम त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या गणेश ट्रेडिंग कंपनीच्या नावे असलेल्या खातेवर पैसे भरण्यास सांगितले. १२ जुलै रोजी २ लाख ८० हजार रुपये रुपये रोखीने सोलापूरमध्ये आणि १३ जुलै २०२३ रोजी सांगोला बस स्थानकावरील पार्किंगमध्ये रोख ३ लाख रुपये फिर्यादीस देण्यास भाग पाडले.

आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅक पासबुक अशी कागदपत्रे घेऊन डी. मॅट. अकौंट उघडले नाही, कसलाही परतावा दिला नाही, नंतर सर्वांनी त्यांचे मोबाईल बंद केले, बेवसाईट बंद केली. डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ मध्ये झूम मिटींग घेऊन पैसे परत देण्याचे पुन्हा आमिष दाखविले. त्यानंतर आजपावेतो कसलाही परतावा दिला नाही, म्हणून कॅपमोअर एफ.एक्स कंपनीचे अजयकुमार आर्या, सौरभ चावला, बलजित सिंग, करणजित सिंग व राजेंद्र कुमार यांनी सर्वांनी ५ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्यादीत नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR