सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत महानगरपालिका क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व वुशु असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शालेय शहरस्तरीय वुशु स्पर्धा २०२४ घेण्यात आले होते.
सदर स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना असोसिएशन ऑफ जीत कुणे दो मार्शल आर्ट स्पोर्ट्स सोलापूर व आदित्य फाउंडेशन यांच्या तर्फे सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी प्रमुख उपस्थिती ऑल इंडिया जीत कुणे दो फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज गायकवाड, आदित्य फाउंडेशनचे संस्थापक रवि कांबळे, महानगरपालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप , नगरसेविका अश्विनी चव्हाण, मागास समाज सेवा मंडळाचे सचिव किरण चव्हाण, नरेश घोरपडे, जागृती कॉलेजचे प्राध्यापक श्रीधर सगेल, वसुंधरा कॉलेजचे प्राध्यापक मारुती घंटेवाडी, किशोर चंदनशिवे, सत्यभामा गायकवाड, सम्राट गायकवाड, अभिजीत गायकवाड, संदीप गायकवाड, विश्वजीत गायकवाड, नागेश कांबळे तसेच विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.