परभणी : आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिर शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील अरबिंदो अक्षर ज्योती विद्यालय पाथरी रोड येथे घेण्यात आले. तसेच या प्रभागात ज्येष्ठ नागरिक मंचची स्थापना करण्यात आली. या शिबिरात परीसरातील ८१२ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आ. डॉ. पाटील यांच्या पुढाकारातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये व मतदार संघातील प्रत्येक गावात गेल्या ९ वर्षापासून सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबिर घेतले जात आहेत. या अंतर्गत पाथरी रोड येथील अरबिंदो अक्षर ज्योती विद्यालयात रविवार, दि.१० डिसेंबर रोजी घेतलेल्या शिबिरात नेत्र, कान, बीपी, शुगर, अस्थिरोग, बिएमडी मशिनद्वारे हाडांची ठिसुळता तपासणी, मोतीबिंदू, दंतरोग, महिलांशी निगडीत विविध आजार आदी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. ज्या नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरजेनुसार इतर शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहेत.
या वेळी युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, तालुका प्रमुख नंदू आवचार, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, कृउबा समिती सदस्य संग्राम जामकर, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, प्रा. गजानन काकडे, आरोग्य समन्वयक राहुल कांबळे, प्रसाद सिंगणापूरकर, बाळासाहेब गोडबोले, गणेश मुळे, रामराव डोंगरे, प्रसाद चांदणे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.परमेश्वर गिराम, डॉ.पंढरी गादेकर, डॉ.शुभांगी थोरात, डॉ.अमृता देशमुख यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराच्या यशस्वितेसाठी मनोज पवार, भाऊ होंडे, अमोल वाघमारे, महेश पारवेकर, शुभम हाके, रोहन कांबळे, सुभाष टाक, संतोष ठाकूर, ईश्वर काळे, रामेश्वर आवचार, नकुल शुक्ल, जिजू भोंड, मारोती काचगुंडे, अजय कदम, अजय पानपट, धनंजय पवार, आनंद सरकटे, नरेश कंठाळे यांच्यासह शिवसेना, युवासेना, दलित आघाडी, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.