22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशात 'इंडिया आघाडी'चे जागावाटप ठरले!

उत्तर प्रदेशात ‘इंडिया आघाडी’चे जागावाटप ठरले!

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे जागावाटप ठरले आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधील जागांवर सपा आणि काँग्रेसमध्ये चर्चा झाली आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये ११ जागांवर निवडणूक लढवणार आहे. यूपीमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. सपा आणि काँग्रेस हे दोघेही इंडिया आघाडीचा भाग आहेत. मात्र, काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

अलीकडेच अखिलेश यादव यांनी काँग्रेसबाबत संतप्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली होती. आता अखिलेश यादव यांनी शनिवारी म्हटले की, काँग्रेससोबतची आमची सौहार्दपूर्ण आघाडी ११ मजबूत जागांसह चांगली सुरुवात करत आहे. ही परंपरा विजयी समीकरणे पुढेही पाहायला मिळेल. ‘इंडिया’ची टीम आणि ‘पीडीए’ची रणनीती इतिहास बदलेल, असेही यादव म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये सपाने काँग्रेसला ११ जागा देण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी रायबरेली आणि अमेठी या दोन जागा विचारात घेतल्या जात आहेत. याशिवाय आणखी कोणत्या नऊ जागा दिल्या आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. वृत्तानुसार, काँग्रेस पश्चिम उत्तर प्रदेशातील चार जागांवर निवडणूक लढवू शकते. यापैकी एक जागा अमरोहा असू शकते, जिथे कुंवर दानिश अली खासदार आहेत. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्येच त्यांची बसपातून हकालपट्टी करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR