22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeपरभणीपोलिस पाटील संघटना परभणी तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सोळंके यांची निवड

पोलिस पाटील संघटना परभणी तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सोळंके यांची निवड

परभणी : न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या परभणी तालुकाध्यक्षपदी पारवा येथील पोलीस पाटील ज्ञानेश्वर वैजनाथराव सोळंके यांची निवड करण्यात आली आहे. तालुका सचिवपदी बाळासाहेब पांढरकर यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते परभणी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सोळंके यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाले, कोकण विभाग अध्यक्ष संजय पाटील, राज्य सहसचिव लक्ष्मण पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष दिगंबर रणेर, जिल्हाध्यक्ष अशोक गोरे, परभणी जिल्हा सचिव चव्हाण, जिल्हा संघटक सुरेश देंडगे, महिला जिल्हाध्यक्ष धनले, पो.पा. मुनेश्वर देवडे, माऊली शिंदे, ज्ञानराज शिंदे, थोरात, रामभाऊ आव्हाड, दत्ता राऊत आदि उपस्थित होते. या निवडीबद्दल पोलीस पाटील ज्ञानेश्वर सोळंके यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR