सेलू : गंगापूर येथील राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत परभणी जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले होते. जिल्हा संघातील चार खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने गाझीपूर उत्तरप्रदेश येथे दि.३१ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या २६व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नूतन विद्यालय येथील प्रसाद संजय महाले, आर्यन रामभाऊ गायके, सार्थक दिंगबर माळकर, कु. गायञी दत्ता गायके यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
या यशाबदल संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव डॉ व्हि.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, रोहिदास मोगल, प्रशांत नाईक, संजय भुमकर, टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य सचिव गणेश माळवे, राज्य कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, जिल्हा सचिव सतीश नावाडे, प्रा.नागेश कान्हेकर, सचिव प्रमोद महाजन आदींनी शुभेच्छा दिल्या.