पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.नुकतेच त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यापूर्वी त्यांच्या निवास स्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली.
सहपोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील,पोलिस उपायुक्त संदीप गिल, स्वरमयी गुरुकुलचे प्रसाद भडसावळे व संजीव महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवास पोलीस दलातर्फे शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
उपविभागीय अधिकारी स्रेहा किसवे- देवकाते, तहसिलदार राधिका बारटक्के, स्वरमयी गुरुकुलचे सदस्य यांच्यासह गायन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.