35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeहिंगोलीअष्टीकरांना विजयी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे मातब्बर नेते मैदानात  

अष्टीकरांना विजयी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे मातब्बर नेते मैदानात  

हिंगोली/आय. डी. पठाण :
हिंगोली लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार बापुराव पाटील अष्टीकर यांना विजयी करण्यासाठी हिंगोली लोकसभेतील काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे नेते मैदानात उतरले आहेत. हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, वसमत विधानसभेचे माजी आमदार व माजी मंत्री व साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उध्दव ठाकरे गट शिवसेनेचे माजी आमदार व माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा, वसमतचे माजी आमदार पंडितराव देशमुख, माजी आमदार मुंजाजी जाधव, फारुख जवळाबाजारकर हे सुध्दा सज्ज झाले आहेत.

सोबतच वसंतराव पतंगे, काँग्रेसचे हिंगोली विधानसभेचे तीन वेळा नेतृत्व करणारे भाऊराव पाटील गोरेगावकर व त्यांची टीम व हिंगोली लोकसभेचे माजी खासदार कै. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञाताई सातव, उत्तमराव मगर असे अनेक कार्यकर्ते आहेत.

हिंगोलीचे माजी खासदार व हदगाव विधानसभेचे माजी आमदार सुभाषराव वानखेडे, काँग्रेस प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन नाईक, हदगावचे आमदार माधवराव जरोडेकर, कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सेनगावचे संदेश देशमुख, संपर्कप्रमुख विनायक भिसे आदी लहान-मोठे कायकर्ते व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध सहकारी सोसायटीचे सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच हे आघाडीच्या नेत्याला निवडून देण्यासाठी सगळेच मैदानात उतरले आहेत.

याबाबत जनतेमध्ये सुध्दा उलट-सुलट चर्चा ऐकायला मिळते की, बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नाव बुडू द्यायचे नाही. त्यामुळे आता कॉर्नर बैठका, मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे जोरात सुरू असून आता मात्र प्रचाराने जोर धरला असून सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते भेटीगाठी व प्रचारात उतरल्याचे दिसत असून मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे चित्र मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR