29.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात जीबीएसमुळे सातवा मृत्यू

राज्यात जीबीएसमुळे सातवा मृत्यू

३७ वर्षीय पुरूषाने गमवला जीव सध्या १६७ रुग्ण

पुणे : महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम(जीबीएस) च्या संशयित रुग्णांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. १६७ रुग्णांमध्ये या सिंड्रोमची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत या आजारामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पुण्यात एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

४८ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत आणि २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये पुणे महानगरपालिकेतील ३९, पुण्यालगतच्या गावातील ९१, पिंपरी चिंचवडमधील २९, पुणे ग्रामीणमधील २५ आणि इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण आहेत. यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या १८० होती. नांदेडजवळील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये जीबी सिंड्रोमचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याचे एका अधिका-याने सांगितले होते. येथे पाण्याचा नमुना घेण्यात आला, जो कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. हे पाण्यात आढळणारे जीवाणू आहेत.

नांदेड आणि आसपासच्या परिसरात जीबी सिंड्रोम दूषित पाण्यामुळे होत असल्याची पुष्टी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केली आहे. पुणे महानगरपालिकेने नांदेड आणि परिसरातील ११ खासगी आरओसह ३० प्लांट सील केले आहेत.

६३ वर्षीय व्यक्तीचा ६ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. आरोग्य अधिका-यांनी सांगितले होते की, ताप आणि पायात अशक्तपणाची तक्रार केल्यानंतर वृद्ध व्यक्तीला सिंहगड रोड परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी केल्यावर असे आढळून आले की त्याला जीबी सिंड्रोम आहे. इस्केमिक स्ट्रोकमुळे त्यांचे निधन झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR