28.9 C
Latur
Sunday, February 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात कडाक्याची थंडी!

राज्यात कडाक्याची थंडी!

विदर्भात पावसाच्या सरी हवामान खात्यानेही दिला अलर्ट

नागपूर : भारतीय हवामान खात्याने कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. शनिवारी उपराजधानीसह विदर्भातील काही शहरांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.

उत्तर भारतासह संपूर्ण देशात जोरदार थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील झाला आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरात किंवा तापमानाचा पारा कमी कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्यानेही महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असा इशारा दिला होता. उत्तरेकडून येणा-या थंड वा-यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे.

मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट होत आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, यादरम्यान शनिवारी उपराजधानीत रात्रीच्या सुमारास अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर विदर्भातील काही शहरात देखील शनिवारी पावसाच्या सरी कोसळल्या. आता भारतीय हवामान खात्याने सुद्धा विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज दिला आहे. त्यानुसार पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

काही जिल्ह्यांत मुसळधार
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून शेतक-यांचीचिंता वाढला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR