27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeमनोरंजनशाहरूख पोहोचला अबरामच्या शाळेत

शाहरूख पोहोचला अबरामच्या शाळेत

मुंबई : अभिनेता शाहरूख खान फक्त उत्तम अभिनेताच नाही तर, एक प्रेमळ आणि जबाबदार वडील देखील आहे. स्वत:ची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शाहरूख खान कायम मुलांना प्रेरणा देताना दिसतो. आता देखील तो लहान मुलगा अबराम खान याच्या शाळेत पोहोचला. धीरूभाई अंबानी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तो उपस्थित होता. शाहरूख खान याच्या फॅनपेजवर काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. फोटोंमध्ये प्रत्येक विद्यार्थी किंग खान याला ऐकताना दिसत आहेत. तर दुस-या फोटोमध्ये अबराम खान गिटार वाजवताना दिसत आहे.

सांगायचे झाले तर, शाहरूख खान याचे अनेक फॅन पेज आहेत. जे कायम अभिनेत्याचे फोटो आणि व्हीडीओ पोस्ट करत असतात. आता त्याच्या फॅन पेजवर शाहरूख खान याचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. शाळेच्या एका कार्यक्रमात त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्यात आले होते.

शाळेत पोहोचल्यानंतर शाहरूख खान याने विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत अनेक खेळ खेळले. एवढेच नाही तर, किंग खान याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले. एका फोटोमध्ये किंग खान मुलासोबत दिसत आहे.

शाहरूखप्रमाणेच लोकांना त्याची मुलेही खूप आवडतात. अबराम हा सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अबराम गिटार वाजवताना दिसत आहे. अबराम कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गौरी खान आणि शाहरूख खान यांचा लहान मुलगा अबराम सध्या पाचव्या इयत्तेत शिकत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR