मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमॅन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राजेशाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला दिग्गज राजकीय नेतेमंडळींसह अक्षरश: संपूर्ण बॉलिवूड अवतरले होते. या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचा किंग खान देखील आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होता. मात्र, या लग्नसोहळ्या दरम्यान किंग खानच्या एका कृत्याचे कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे.
बॉलिवूडचा किंग खान नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कृत्यांनी चाहत्यांचे मन जिंकतो. अंबानींच्या विवाहसोहळ्यात देखील शाहरुखच्या याच कृत्याने लोक अक्षरश: भारावून गेले आहेत. या लग्नसोहळ्यात बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना भेटताना शाहरूख खान वाकून पाया पडला. त्यांना नमस्कार केला यावेळी बिग बींनी त्याला आशीर्वादही दिले. तसेच, शाहरुखने या ठिकाणी उपस्थित असलेले सुपरस्टार रजनीकांत, त्यांची पत्नी यांच्या देखील पाया पडल्या. या व्हीडीओला पाहताच शाहरूखने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे. अर्थात, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाहसोहळ्यादरम्यान अनेक व्हीडीओ व्हायरल झाले. पण, शाहरूखचे हे जेस्चर मात्र सर्वांना भावले.
सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव
शाहरूखचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अवघ्या काही तासांतच हा व्हिडीओ ९० हजारांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे. तसेच, या व्हीडीओवर चाहत्यांच्या इंटरेंिस्टग कमेंट्सही पाहायला मिळतायत. या कमेंटमध्ये एका फॅनने लिहीले आहे. दॅट्स व्हाय आय एम जबरा फॅन. तर, दुस-या फॅनने म्हटले आहे, म्हणूनच तर आम्ही म्हणतो, की प्रत्येकजण एसआरके नाही होऊ शकत. तर, आणखी एका यूजरने लिहीले आहे.