कोल्हापूर : फक्त कोल्हापूरच नव्हे तर राज्यसह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.
आठ फेऱ्यांचे मतदान मोजून पार पडले असून शाहू महाराजांची लीड ५४ हजरांवर पोहोचले आहे. त्यामुळे शाहू महाराज यांनी निर्णायक आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून मान गादीला आणि मत मोदीला अशा पद्धतीने प्रचार करण्यात आला होता. मात्र, शाहू महाराजांनी विजयाकडे केलेली वाटचाल पाहता कोल्हापुरात मान आणि मत गादीला दिल्याचे स्पष्ट होत आहे.