22.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रशांतिगिरी महाराजांचा ‘एकला चलो रे’ चा नारा!

शांतिगिरी महाराजांचा ‘एकला चलो रे’ चा नारा!

महायुतीला नाराजी परवडेल का?

नाशिक : नाशिकच्या राजकीय आखाड्यात आता खरा कस आणि दम लागणार आहे. शांतिगिरी महाराज यांना महायुतीकडून तिकिट मिळण्याची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती.

त्यानंतर एकच खळबळ उडाली. शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. पण बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या निर्णयानंतर नाशिक लोकसभा निवडणुकीत अधिक रंगत येणार आहे.

नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. त्यांना महायुतीकडून तिकिट मिळण्याचा विश्वास होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केले. हेमंत गोडसे हे नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली. शिंदेंच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी तिकिट मिळाले नाही तर अपक्ष लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. शांतिगिरी महाराज मविआच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR