27.1 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमनोरंजनती तिच्या इच्छेनुसार लग्न करू शकते

ती तिच्या इच्छेनुसार लग्न करू शकते

मुंबई : प्रतिनिधी
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल येत्या २३ जूनला लग्नगाठ बांधणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे कपल पर्सनल लाईफमुळे चर्चेत आले आहे. दोघांच्याही घरी जरी लगीनघाई सुरू असली तरीही सोनाक्षी सिन्हाचे कुटुंबीय सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नाबद्दल नाराज आहेत. सोनाक्षीचा भाऊ लव आणि तिच्या आईने अभिनेत्रीला काल इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचीही चर्चा होत आहे. अशातच सोनाक्षीचे वडील आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा रंगली आहे. होत असलेल्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हाने सांगितले की, मला सांगा, नेमकं आयुष्य कोणाचे आहे? सोनाक्षी माझी एकुलती एक लेक आहे. माझ्या लाडक्या लेकीचे हे आयुष्य आहे. मला तिचा खूप अभिमान असून मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो. ती मला तिच्या आयुष्यातील भक्कम आधारस्तंभ समजते. मी नक्कीच माझ्या लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे. मी नेहमीच तिच्या आनंदात सहभागी होतो, तिचा आनंद तोच माझाही आनंद… तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती तिच्या इच्छेनुसार लग्न करू शकते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलाखतीमध्ये पुन्हा सांगितले की, मी दिल्लीत माझ्या राजकीय कामांसाठी आहे. मी मुंबईमध्ये फक्त तिची (सोनाक्षी सिन्हाची) ताकद म्हणून नाही तर तिचे सुरक्षाकवच म्हणून मुंबईमध्ये आहे. सोनाक्षी आणि झहीरला एकत्र राहायचे आहे, ते एकत्र छान दिसतात. अनेक जण खोटी माहिती पसरवत आहेत, कृपया खोटी माहिती पसरवणे थांबवा. दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर येत्या २३ जूनला लग्नगाठ बांधणार आहेत. मुंबईत अगदी मोजक्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत ते विवाहबंधनात अडकणार आहेत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR