परभणी : नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत ओपन गटात अंडर १९ मध्ये परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात राहत असलेल्या शेख खाजा शेख आमिन याने देशात तिसरा क्रमांक पटकावत ब्राँझ पदक पटकावले आहे. या स्पर्धा दिल्ली येथे दि. २५ ते २९ डिसेंबर दरम्यान पार पडल्या होत्या.
परभणी येथील रेल्वे स्टेशनवर आज शेख खाजा योच आगमन झाले असता राजे संभाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष खा. संजय जाधव व राजे संभाजी तालीमचे अध्यक्ष वस्ताद आण्णा डीघोळे यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य सत्कार करण्यात आला.
शेख खाजा याने या अगोदर सातारा येथे झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकाविले आहे. आज त्याच्या विजया बद्दल राज डिघोळे, अर्जुन डिघोळे, पैलवान बिसमिल्ला पठाण, पैलवान महेश सोनवणे, पैलावांन जयदिप गित्ते, विक्की खंदारे, अनिल अव्हाड, प्रणव भालेराव, कार्तिक कल्लपा, वजेंद्र सोनटक्के, उत्कर्ष नदे, सुशील मोरे, निखिल शिंदे, नारायण अपशिंगे, अभी शिंदे, कान्हा ओपले उपस्थित राहून राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने पैलवान शेख खाजा यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.