मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गो-हे यांच्या विरोधात अवमानजनक विधान केल्याचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या नेतृत्वात पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळसाहेब भवन येथे राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर, कंगना राणावत, नवनीत राणा यांना वाईट बोलून अपमान केला आहे. राजकारणात टीका करताना राऊतांनी भाषा नीट वापरावी. नाहीच सुधारले तर पुढच्या वेळी तुमच्या तोंडात चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत असा इशारा शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी दिला.