34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeहिंगोलीहिंगोलीत शिंदे गटाला उमेदवारी; भाजपचे योगी शाम भारती महाराज अपक्ष दंड थोपटणार?

हिंगोलीत शिंदे गटाला उमेदवारी; भाजपचे योगी शाम भारती महाराज अपक्ष दंड थोपटणार?

माहूर (विशेष प्रतिनिधी): हिंगोली मतदारसंघ महायुती मध्ये शिंदे गटाकडे आला आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी टोकाचा विरोध केल्याने हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर टाच येत असताना पर्यायी दुसरा उमेदवार सुद्धा शिंदे गटाने बाबुराव कोहलीकर यांना पसंती दर्शविल्याने भाजपच्या गोटात प्रंचड संतापाची लाट असून हिंगोलीची जागा भाजपला मिळावी हा अट्टाहास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावून धरला असताना भाजपचे अध्यात्मिक आघाडी प्रमुख तथा मिशन मोदी अगेन पीएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माहूर येथील योगी श्­ााम भारती महाराज यांनी निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. योगी श्­ााम भारती महाराज यांच्या शिष्यांनीही त्यांना उमेदवारी दाखल करण्याची गळ घातली होती. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे विस्वस्रिय माहिती प्राप्त झाली आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाटायला यावा यासाठी भाजपाच्या प्रमुख इच्छुक नेत्यांनी एकत्रित येऊन राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती केली होती. मात्र त्यांना यश आले नाही. हिंगोली लोकसभा मतदार संघ शिंदे गटाच्या वाट्याला गेला. दोन दिवसापूर्वी हिंगोलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांची एक बैठक झाली त्यात हेमंत पाटलांच्या नावाला प्रचंड विरोध करत कार्यकर्त्यानी हैदुल्ला माजविला. याची दखल महायुतीला घ्यावी लागली. हेमंत पाटलांच्या जाहीर झालेल्या उमेदवारीवर संक्रात आली मात्र हा मतदार संघ शिंदे गटाने भाजपा ला सोडला नाही.

भाजपच्या कार्यकर्त्यांची प्रखर इच्छा शक्ती व व्यक्तिक योगी शाम भारती महाराज यांच्या शिष्यांनीही महाराजांना निवडणूक लढविण्यासाठी हीच ती योग्य वेळ अशी साद दिल्याने माहूरचे योगी शाम भारती महाराज अपक्ष हिंगोली लोकसभेच्या रणसंग्रामात उतरणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली असून भाजपाच्या हिंदूू विजनच्या प्रमुख लोकांची त्यांना पडद्या आड साथ असल्याचेही बोलल्या जात आहे. त्यामुळे गत २०१९ मध्ये नागपूर मुख्यालयाच्या फोनमुळे निवडणुकीत दोन हात करण्यापासून थांबलेले शाम बापू महाराज यंदा मात्र अपक्ष निवडणूक लढणार हे जवळ जवळ निश्चित मानले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR