23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयलोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे पिछाडीवर

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे पिछाडीवर

नवी दिल्ली : आज जर लोकसभा निवडणूक झाली तर भाजप प्रणित एनडीएला किती आणि इंडिया आघाडी व विरोधकांना किती जागा मिळणार याचे दोन दिवसांपूर्वीच ओपिनिअन पोल आले होते. यातच देशातली विविध राज्यांपैकी त्या त्या राज्यात कोणते मुख्यमंत्री सर्वाधिक पसंतीचे आहेत, याचीही आकडेवारी इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनमध्ये देण्यात आली होती. यामध्ये ओडिशाचे सीएम नवीन पटनायक यांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का देणारी आकडेवारी आली आहे.

नवीन पटनायक यांना ५२.७ टक्के जनतेने पसंतीचे असल्याचे म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुस-या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांना ४६.९% टक्के जनतेने पसंती दिली आहे. तिस-या क्रमांकावर आसामचे हिमंत बिस्वा शर्मा ४८.६ टक्के मते घेऊन आले आहेत. गुजरातचे सीएम ४२.६ टक्के मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रात शिवसेना काबीज करत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात खूप मागे पडले आहेत. शिंदे यांना महाराष्ट्रातून अवघी १.९ टक्के लोकांचीच मते पडली आहेत. शिंदे यांची राज्यात पसंती खूपच कमी झाली आहे हे यावरून दिसून येत आहे. या यादीत शिंदे यांचा शेवटून तिसरा क्रमांक लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR