38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकडूंचा तिढा शिंदे सोडवतील

कडूंचा तिढा शिंदे सोडवतील

अमरावती : प्रतिनिधी
नवनीत राणा भाजपात तर रवी राणा कुठे आहेत? वेळ प्रसंगी नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करू, असा इशारा कडूंनी दिला असता कडूंच्या भूमिकेबद्दल अमरावतीत प्रसारमाध्यमांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला. त्यावर बावनकुळे म्हणाले, कडूंचा वेगळा पक्ष असून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. कडू हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युतीत आहेत. कडूंची थेट भाजपशी नाही तर शिंदेंबरोबर युती आहे. कडूंचा तिढा शिंदे सोडवतील. कडूंनी नाही ऐकले, तर मतदार ठरवतील ते होईल.

अभिजीत अडसूळ यांनी दिनेश बूब यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बावनकुळेंनी म्हटले आहे, अभिजीत काहीही बोलले असले, तरी मी, आनंदराव अडसुळांसह अमित शहा यांना भेटलो आहे.

आनंदरावांचा सन्मान राखणं ही एकनाथ शिंदेंसह आमची सर्वांची जबाबदारी आहे. आनंदरावांची केंद्रीय आणि राज्यातील नेते उंची राखतील, हा मला विश्वास आहे. त्यामुळे अभिजीत यांच्याबद्दल आनंदराव निर्णय घेतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR