23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रवरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात

वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. अपघात झाला. त्यावेळी राजेश शहा गाडीत नव्हते. मात्र, वरळीतील हिट अँड रन प्रकरण घडले त्यावेळी पांढ-या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता. आरोपी मुलगा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही कसून शोध घेत आहेत. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरळी पोलिसांनी हिट अ‍ॅड रन केसमध्ये एक पांढ-या रंगाची बीएमडब्ल्यू गाडी ताब्यात घेतली आहे. ज्यावर एका पक्षाचे चिन्ह असून अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गाडीसोबतच संशयिताला ताब्यात घेतले आहे. मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अ‍ॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अ‍ॅट्रिया मॉलजवळच असणा-या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते.

मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नव-याचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नव-याने प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वत:ला बाजूला होता आले नाही.

अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्याने बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR