कोल्हापूर : शिवसेनेच्या येथील राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. याच बरोबर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व म्हणजे ४८ जागा जिंकण्याचा निर्धारही ठरावाद्वारे व्यक्त करण्यात आला. राज्यात वैविध्यपूर्ण योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्या-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ठरावाद्वारे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
या अधिवेशात झालेले ठराव खालीलप्रमाणे
– भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीबाबत अभिनंदन.
– देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीबाबत अभिनंदन.
– राम मंदिर प्रतिष्ठापनेबद्दल अभिनंदन
– लोकसभा निवडणुकीत मिशन ४८ म्हणजेच सर्व ४८ जागांवर महायुती विजयी होणे. या दृष्टीने सर्व निर्णय आणि त्याबाबतचे सर्व अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्यात येत आहेत.
– शपथ… राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर महायुती ंिंजकण्यासाठी पदाधिका-यांना दिली शपथ
– बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केले अशा शिवसेना नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक सात पुरस्कार देण्यचा निर्णय.