27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रअमित ठाकरेंची उमेदवारी निश्चित?; शिंदे भांडूपची जागा सोडणार

अमित ठाकरेंची उमेदवारी निश्चित?; शिंदे भांडूपची जागा सोडणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित ठाकरे यांच्याकरीता भांडूपमध्ये शिवसेनेचा उमेदवार देणार नसल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेंसाठी पुढाकार घेतला असून भांडूपमध्ये शिवसेना उमेदवार देणार नसल्याची माहिती मिळत आहे. असे झाल्यास अमित ठाकरे भांडूपमधून निवडणूक लढवतील असे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यातली जवळीक आणखी वाढली आहे. राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेना जागा सोडायला तयार आहे. मनसे नेते अमित ठाकरे निवडणुकीच्या ंिरगणात उतरणार असतील तर शिवसेना त्यांच्यासाठी जागा सोडणार आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेना भांडुप मतदारसंघ सोडायला शिवसेना तयार आहे.

मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली गेली तर ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या ंिरगणात उतरतील, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अजून अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेतलेला नाही. भांडुप मतदारसंघामध्ये सध्या रमेश कोरगावकर हे आमदार आहेत. रमेश कोरगावकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा एकनाथ शिदे यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता आहे, पण अमित ठाकरे निवडणुकीच्या ंिरगणात उतरले तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही जागा सोडायला तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR