22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्र‘शिवशाही’ अविरतपणे सुरू राहणार

‘शिवशाही’ अविरतपणे सुरू राहणार

एसटी महामंडळाकडून खुलासा

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या बातम्या येत असताना राज्यभरात वेगाने धावणारी शिवशाही बस बंद होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, सातत्याने पसरत असलेल्या अफवांवर अखेर एसटी महामंडळाने पडदा टाकला आहे. एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही (वातानुकूलित ) बसेस सुरू आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. त्यापैकी ५०० बस धावत असून उर्वरित ३९२ बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत.

शिवशाही बस या वातानुकूलित असतात. मात्र आता त्याचे लालपरीत रुपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार असल्याचेही बोलले जात होते.
मात्र, एसटी महामंडळाकडून शिवशाही बसेसची सेवा अविरतपणे सुरू राहणार असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले.

जून २०१७ ला ‘शिवशाही’ची सुरुवात
शिवशाही ही बस प्रथम १० जून २०१७ रोजी मुंबई-रामगिरी मार्गावर धावली होती. तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात शिवशाही बसेस धाऊ लागल्या. त्यात महिलांना निम्म्या तिकिटाची सुविधा मिळू लागल्याने शिवशाही बस जोरात धाऊ लागल्या. निम्म्या दरात वातानुकूलित बसची सुविधा मिळत असल्याने महिला शिवशाही बसचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR