30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रपुरणपोळी दूध की तुपासोबत खायची? प्रकाश आंबेडकर-मुंडे यांच्यात चर्चा

पुरणपोळी दूध की तुपासोबत खायची? प्रकाश आंबेडकर-मुंडे यांच्यात चर्चा

बीड : एकीकडे वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीशी गेले अनेक दिवस बैठकांवर बैठका सुरु असतानाही जागा वाटपाचा तिढा काही सुटत नसल्याचे समोर आले आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी आज बीड येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आपण वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त येथे दर्शनाला आलो असून येथे कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

आपण येथे १९ वेळा पूजेला आलो आहे. येथे आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत पुरण पोळीचे जेवण केले आहे. पुरणपोळी दूधासोबत खायची कि तुपासोबत यावर आमची चर्चा झाली, असे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच मला राजकीय चर्चा करायची असेल तर मी थेट त्यांचे बॉसच येथे येत आहेत त्यांच्याशीच करेल ना असे उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR