नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळले गेले असून , यात एक सामना इंग्लंडने तर दुसरा सामना भारताने जिंकला आहे. आता मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर संपूर्ण मालिकेतून बाहेर पडले आहेत. कोहलीने सुरुवातिचे दोन सामनेही वैयक्तिक कारनामुळे खेळले नव्हते. आता तो संपूर्ण मालिकेतूनच बाहेर पडला आहे. तर दुसरीकडे अय्यरला दुखापतीमुळे का खराब कामगीरीमुळे बाहेरचा रस्ता दाखवला याचे कारण सांगितले नाही.
मालिकेतील हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली तर विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारताने जिंकली. या दोन्ही कसोटी सामन्यांत श्रेयश अय्यर याला चांगली कामगीरी करता आली नव्हती. यामुळे त्याच्यावर अनेक स्थरावरुन टीकाही करण्यात येत होती आणि शेवटचे तीन सामन्यातून त्याला वगळण्यात येईल अशी शक्यता वर्तवीली जात होती. तेच झाले बीसीसीआयने त्याला मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांमधून वगळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. तर रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांचे संघात पुनरागमन झाले असून, युवा गोलंदाज आकाश दीपलाही संघात स्थान देण्यात अले आहे.
कसोटीतील मागील १३ डावात अपयशी
टीम इंडियात कोहलीच्या अनुपस्थितीत अय्यरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली मात्र तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. अय्यरला विशाखापट्टणममधील दोन डावांमध्ये केवळ २७ आणि २९ धावा करता आल्या. तर मागील १३ डावांमध्ये तो अपयशी ठरला आहे. अय्यरने डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे अर्धशतक ठोकले होते. त्यानंतर त्याने २९, ४, १२, ०, २६, ३१, ६, ०, ४, ३५, १३, २७ आणि २९ धावा केल्या.
तीन सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.