30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeसोलापूरसाने गुरुजी कथामाला जिल्हा समितीला श्यामची आई संस्कार दूत पुरस्कार

साने गुरुजी कथामाला जिल्हा समितीला श्यामची आई संस्कार दूत पुरस्कार

सोलापूर : गोवा येथे झालेल्या 56 व्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अधिवेशनात सोलापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला जिल्हा समितीला श्यामची आई संस्कार दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्यामची आई संस्कार परीक्षा देण्यासाठी जवळजवळ अडीच हजार विद्यार्थ्यांना जिल्हा समितीच्या वतीने प्रेरित केले होते. गोवा येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात हा पुरस्कार गोव्याचे समाज कल्याण व पुरतत्व खाते मंत्री सुभाष उत्तम फळदेसाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. जिल्हा समितीचे अध्यक्ष अशोक खानापुरे, अशोक म्हमाणे यांनी हा पुरस्कार विनयपूर्वक स्वीकारला.यावेळी राजन गवस, संदीप निगळ्ये , शामराव कराळे, लालासाहेब पाटील, सुनील पुजारी, कांतराव गाजरे, मोहन सावंत इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.तसेच अशोक खानापुरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अ. भा. साने गुरुजी कथामाला वरळी शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ पगडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

गोवा अधिवेशनासाठी सोलापूर जिल्हा समितीचे अरुणकुमार धुमाळ, प्रा.गणेश लेंगरे, शिवलिंगप्पा शहाबादे, भीमराव कोरे, रंगसिद्ध दसाडे, रामकृष्ण अघोर, सुरेंद्र पत्की, परमेश्वर व्हसुरे आणि शिवप्पा घाले इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR